“व्हाइट हेट ज्युनिअर” हा आयटी क्षेत्रातील अनेक तज्ञांनी चालू केलेला एक स्टार्टअप आहे जो ट्रॅप स्वरूपाचा आहे. अशा सिस्टीम्समधे एक बेसीक सिस्टीम उभी केली जाते व त्याचे फार मोठ्या प्रमाणावर ग्लोरीफिकेशन केले जाते. इतके की तुमचा विश्वास बसतो की ह्याला पर्याय नाही. मग मोठ्या प्रमाणात ऑफर आणि डिस्काऊंट दिले जातात आणि रजिस्ट्रेशन क्लेम करतात. एकदा ऑडीअन्स रेडी झाला आणि १००,००० सबस्क्राइबर सारखी मॅजिक फिगर आली की असे स्टार्टअप घ्यायला मोठे प्लेअर बसलेलेच असतात. जसे की आता हा स्टार्टअप बैजूज ने विकत घेतला..
हे झाले ब्रम्हज्ञान. ह्याचा तसाही कुणाला काही उपयोग नाही. मग उपयोग कसला आहे?? “प्रिंसीपल” चा. मुख्य आयडीया काय होती? मुलांनी ऍप बनवणे किंवा कोडींग शिकणे. मुळात हे प्रिंसीपल बरोबर आहे का हे तपासणे आवश्यक आहे. ह्यासाठी मी एक लेख लिहीला होता. मोठा आहे, त्याचा आवश्यक एक्स्ट्रॅक्ट इथे देतो –
जसे मुलांना इंग्रजी ही ‘जगाची ज्ञानभाषा’ म्हणून आपण लहानपणापसूनच शिकवतो तसेच लहान वयातच मुलांना लॉजीक व कोडींगची ओळख झाली तर ते अंगवळणी पडते व भविष्यात कठीण जात नाही. संगणक प्रणालीच्या वापराने मुले लहान वयापासूनच सर्जनशीलतेने विचार करायला, पद्धतशीरपणे तर्क करायला आणि एकमेकांच्या सहकार्याने गटांमधे काम करायला शिकू शकतात. ह्या २१व्या शतकातील सर्वात आवश्यक क्षमता आहेत. जेव्हा मुले कोडींग करतात, तेव्हा ते समस्या सोडवायला, छोट्या मोठ्या प्रकल्पांचे प्लॅन व डिझाइन बनवायला आणि स्वत:च्या कल्पना मांडायला व साकारायला शिकतात.
हे अधिक समजून घेण्यासाठी Scratch – Imagine, Program, Share ह्या अमेरीकेतील MIT ह्या खूप मोठ्या व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज संकेस्थळाला भेट द्या. तुमच्या लक्षात येइल कोडींगचे महत्व. सदर प्रोजेक्ट जगभरातील मुलांना कोडींग शिकता यावे ह्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. जगभरातील १५०हून अधिक देशातून ४,७८,१२,१९१ मुलांनी आजवर स्क्रॅच रजिस्टर केले असून दर महिन्याला ४ लाखाहून अधिक मुले सातत्याने काही ना काही स्क्रॅच करत असतात!
आता हे पहा –
हे आहे उद्याचे जग! तुमचा मुलगा कुठल्याही विषयात जर नाविण्यपूर्ण अलौकीक करू इच्छीत असेल तर ९०% शक्यता आहे की तो कुठल्या ना कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर करेल. आणि कुठलेही तंत्रज्ञान ऑटोमेट करायचे, प्रिसाइज करायचे तर कोडींगला पर्याय नाही… २१व्या शतकात आपले स्वागत आहे!
स्वानुभव : मला ८ वर्षाचा मुलगा आहे. त्याला मी संगणकात काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतो. इंजिनिअर ला आपला मुलगा इंजीनिअर व्हावा वाटतो तसेच हे. कधी चेस शिकवायचा प्रयत्न करतो. पण माझा मुलगा खूप चंचल आहे. आणि तो एक विषय फोकस करू शकत नाही. खूप प्रयत्न/प्रयोग करून झाले. फक्त औषधे वापरली नाही, वापरणारही नाही.. माझा समोर मोठे चॅलेंज की ह्याला फोकस करायला कसे लावू?? अशा वेळी माझे लक्ष स्क्रॅचवर गेले.. फेसबुक का कुठेतरी उनाडक्या करताना मला हे आढळले. खूप आवडले. चिरंजिवांना घेऊन बसलो.. त्याला तासभरात छोटे मोठे प्रयोग दाखवले. मांजर कसे उड्या मारते, फुलपाखरू कसे उडते इ. असे करता करता त्याला म्हटले की आपण गेम बनवूया? तो तर खुषच. आजवर गेम फक्त खेळलाय आता बनवायचा म्हणजे धमालच. आधी थोडा अविश्वास, त्यातून चंचलपणा.. अभ्यास शिकवायला गेलो असतो तर पळाला असता. गेम म्हटल्यावर स्वारी तयार झाली.. त्यालाच विचारले तू सांग कसला गेम बनवूया.. त्याला तर भारी ग्राफीक्स गेम बनवायचा होता, पण मला कुठे तितके कोडींग येत होते. मग त्याला म्हटले छोटा गेम बनवू, आइचे जेवण होण्यापूर्वी झाला पाहीजे.. तर स्क्रॅच शिकताना त्याने फुलपाखरू पाहीलेले.. मला म्हणाला फुलपाखरू उडताना काहीतरी गेम बनवू.. त्यांनी स्क्रॅचवर ट्युटोरीअलमधे फुलपाखरू किंवा विमान उडवायचे कसे इ. ट्युटोरिअल दिले आहेत.. सोपे आहे एकदम.. मग आमचे फुलपाखरू उडायला लागले.. किबोर्ड वरील वर-खाली बाणांची बटने दाबून ते वर खाली पण व्हायचे.. मग ठरले की फुलपाखराला खायला मिळाले तर त्याची साइज मोठी करू.. ते केले.. आणि मग ट्विस्ट आणला.. जसे फुलपाखराला खायला हवे तसेच संकटपण हवे. चॅलेंज हवे ना गेम मधे… नाहीतर कोण खेळणार कशाला?? मग नाकतोडा आणला. तो कुठूनपण येतो.. जर तो फुलपाखराला चावला तर ते मरते! हे सारे बनवले.. https://scratch.mit.edu/projects/343514810/ ह्या लिंकवर हा गेम मुद्दाम पहा. खेळता येतो.. ह्यातील ९०% कोडींग मी केला.. मग नक्की फायदा काय बरे झाला?? –
- मी शानूला फक्त आयडीयाची सुरूवात द्यायचो. प्रत्यक्ष काय करायला हवे हे तो ठरवत होता..
- हे करण्यासाठी साधारण अडीज तास तो एका विषयावर मन लावून काम करत होता. हे मी ८ वर्षात पहील्यांना अनुभवले. त्याला वाटत होते की तो गेम बनवतोय, पण प्रत्यक्ष तो problem solving करत होता, critical thinking करत होता, logic build करत होता..
- ह्या नंतर जे घडले ते अचंबित करणारे होते. गेम पब्लिश झाला आणि आम्ही जेवायला गेलो. बायको नावाची कटकट तुम्हाला माहीत आहेच.. आम्ही जेवून येइस्तो गेमला दोन लाइक आणि कमेंट. जगभरातून आम्ही केलेले उद्योग कुणी ना कुणी पहात होते.. आता शानू धन्य झाला होता. त्याने सहज केलेल्या कामाला ऑडीअन्स होता. दुसऱ्या दिवशी एका महिलेची कमेंट आली. तिने गेम मोबाइल खेळायचा प्रयत्न केला. तिला आला नाही.. मी कमेंट शानूला दाखवली. त्याचा चेहरा पडला. त्याने घडवलेले काहीतरी कुणाला वापरता येत नव्हते. त्याच्यातला ओनरशीप भाव जागा झाला होता. मला विचारले आता काय करूया? मोबाइलला किबोर्ड कसा लावणार? .. मी म्हटले “नाही लावता येत असे. आणि सगळीकडे कसे लोक मोबाइलबरोबर किबोर्ड घेऊन फिरणार? मोबाइल खिशात रहातो, किबोर्ड नाही..” .. तुमचा विश्वास बसणार नाही, त्याने हातातील सारी खेळणी बाजूला टाकली आणि माझा मागे लागला की तिला उत्तर दे. मी पक्के ठरवले होते की त्याचा प्रॉब्लेम त्याने सोडवायचा. मी त्याला प्रॉब्लेममधे सोडून दिला. मग आइच्या मागे लागला की काय करू.. आईने हिंट दिली की जसे तू फुलपाखरू बनवले तसे मोबाइलवर ते फुलपाखरू वर खाली करायला काहीतरी दे ना.. तिथे ह्याला दिशा मिळाली. आणि मग तिथे आम्ही दोन बटने दिली ज्याने ते फुलपाखरू वर-खाली होते आणि हा गेम मोबाइलवर खेळता येतो.. गेम अपग्रेड केला, तिला रिप्लाय टाकला आणि मगच साहेब जेवले… आता मला तो चंचल असल्याची भिती वाटत नाही. २१ शतकात सक्षमपणे जगू शकेल असे लॉजीक, ओनरशीपची जाणिव व जबाबदारी, problem solving आणि critical thinking त्याच्यात आहे ह्याची खात्री झाली होती.. प्रत्यक्ष कोडींग किंवा डिझाइनमधले फिनीश महत्वाचे नाही. मुळात आयडीया, ती ग्रो करणे, ओन करणे आणि समोरच्याला सेल करणे.. इतना जमा तो और क्या चाहीये.. त्या दिवसानंतर मी त्याच्या करीअरची आणि चंचलपणाची काळजी करणे सोडून दिले…
असाच प्रयोग मी इथल्या एका शाळेत केला. ६ वी ७ वीची मुले होती माझा बरोबर.. त्यांना असे इंट्रो देऊन मी ऍक्वेरिअम बनवायला सांगीतले होते.. ८ मुलांनी अक्वेरीअम बनवले. एकाचेही अक्वेरीअम दुसऱ्यासारखे नव्हते.. एकाच सिस्टीमवर काम करणारी, एकाच वयाची, एकाच वर्गातील ८ मुले तुम्हाला एकाच विषयात ८ व्हेरीएशन देऊ शकतात. ही मुले योग्य दिशा मिळाली तर किती मोठे भविष्य साकारू शकतात?? कोडींग करायला शिकवणे म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तिला पंख देण्यासारखे आहे.. आजच स्क्रॅच करा आणि मला नक्की सांगा.. मला भविष्यात मराठीतून मुलांना कोडींग शिकवायची खूप इच्छा आहे. असे काही केले तर कळविनच!