माझे वडील अत्यंत चांगल्या प्रतिचे इलेक्ट्रीशिअन होते. खूप उत्तम प्रतिचे वायरींग, मटेरीअल इ. वापरून सर्व नियमांसहीत सुरक्षीत फिटींग करून देण्यात बाबांचा हातखंडा होता.. तर ह्या व्यवसायाबाबत काही टिप्स मी देतो..
- मटेरीयल कायम उत्तम क्वालिटीचे वापरा. फार कमी ठिकाणी कस्टमर कमी प्रतीचे मटेरीअल वापरायला सांगतो. तेव्हा भविष्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्याला नीट पूर्वकल्पना द्या.
- बोर्ड कापताना, वायर जोडताना कलात्मक दृष्टी ठेवा. तुम्ही केलेले फिटींग दर्शनी भागात उत्तम दिसायला हवे. वायर लोंबत आहेत, भोके पडली आहेत, वेडेवाकडे कापले गेलेय, चिकटपट्टया दिसत आहेत हे खूप वाईट दिसते. परत काम मिळणार नाही..
- उत्तम दर्जाचे ड्रिल आणि इतर उपकरणे वापरा. कामाची क्वालिटी चांगली असते. टार्गेट ठेवून एक एक उपकरणे विकत घ्या. हे आवश्यक आहे. बाजारात येणारी नविन उपकरणे आणि नविन वस्तू तुम्हाला माहीत हवी. ह्या तुम्ही कस्टमरला सुचवू शकता. आणि त्याची विक्री आणि फिटींग दोघांमधून फायदा होतो.
- कामावर जाताना नेहमी चांगले कपडे घालून जा. अगदी इस्त्री केलेले नको. पण स्वच्छ धुतलेले शर्टपँट. जर काम करताना कपडे खराब होणार तर एप्रन वापरा किंवा तिकडे कपडे बदला.
- काही वस्तू नेहमी स्टॉक कराव्या. कायम लागणाऱ्या वायर्स, बटने, स्क्रू इ. वेळेस उपयोगी पडतात.
- वस्तू विकत घेतानाचे व्हेंडर कायम एकच हवे. आणि त्यांच्या सलोख्याचे संबंध हवे. वस्तूत देखील चांगले मार्जीन असतेच. भविष्यात छोटा स्टॉक करून तुमचेच असे दुकान सेट करू शकता.
- फिटींग बरोबरच मोटर रिपेअरींग यायला हवे. पंखे, पाण्याचे पंप, मिक्सर सारखी उपकरणे ह्यामधे हे ज्ञान उपयोगी पडते. अनेकदा अशा उपकरणांमधे विशेष काही फॉल्ट नसतो. थोडी डागडुजी करून चालू करता येऊ शकते. दर वेळी कंपनी सर्वीस मागवायची गरज नाही..
- इतर सर्वीसमन बरोबर नेटवर्क करा. प्लंबर, सुतार, गाद्या बनवणारा, फॅब्रीकेटर, स्लायडींग वाला.. म्हणजे कॉन्टॅक्ट शेअर करता येतात आणि रेफरन्स मधून कामे मिळतात..
- कस्टमर डायरी ठेवा. ज्याच्या ज्याच्याकडे जे काही काम केले त्याची नोंद ठेवा. २-३ महीन्यांनी एक फोन करा की सारे नीट चालू आहे ना? आणि अजून काही हवे आहे का? बरेचदा लोकांना गरज असतेच पण नेमका तुमचा नंबर मिळत नाही. सेव्ह करून देखील. आणि आपल्यासारखे व्यवसाय करणारे कधी कॉलबॅक करून कस्टमरशी संपर्क ठेवत नाही. ह्यामुळे तुमचे खूप नुकसान होते. हे टाळा..
हे सारे केलेत तर तुमच्याच लक्षात येईल की खूप स्कोप आहे.