छोटा व्यवसाय!

उकडलेली अंडी विकणे हा अत्यंत कमी इंवेस्टमेंट मध्ये चालू होणारा, काहीही ऍड, बोर्ड, प्रसिद्धी न लागणारा, सोपा सरळ आणि तरी उत्तम मर्जिन असलेला व्यवसाय आहे. सोबत चाट मसाला, कांदा, टोमॅटो, पाव, मिरचीचा ठेचा इ. गोष्टी ठेवू शकतो. कायम गिऱ्हाईक मिळतेच. नुकसान व्हायची शक्यता 0%. रिझर्व्ह जागा लागत नाही, छोटीशी जागा पुरते, पॅकिंग मटेरियल लागत नाही, प्लेट – वाट्या वगेरे नाही, धुण्याबिण्याचे प्रॉब्लेम नाही..

कुठलाही व्यवसाय छोटा नाही. भीक मागणं कीव चोरी करण्यापेक्षा परिश्रमाने आणि सन्मानाने केलेला छोटासा व्यवसाय देखील प्रतिष्ठेचा आहे असे माझे मत आहे.

Leave a Reply