You are currently viewing सॉफ्टवेअर कंपनी आणि नफा!

सॉफ्टवेअर कंपनी आणि नफा!

सॉफ्टवेअर किंवा आयटी ह्या क्षेत्राबाबत लोकांना अनेक संभ्रम आहेत. मनात अनेक चमत्कारीक संकल्पना आहेत. सॉफ्टवेअर वाले एसीमधे बसून दिडफुटाच्या मशीनवर अक्कल पाजळतात, प्रत्यक्ष अनुभव काहीच नसतो, ग्राऊंट रिऍलीटी माहीतच नसते, शिष्ट असतात असे अनेक गैरसमज, आकस इ. आहे..

 • मी स्वत: २० वर्षे अनुभवी फुल स्टॅक डेव्हलपर आहे. मी एखाद्या प्रतिष्ठीत सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असतो तर माझे पॅकेज साधारण १८ ते २४ असते. ऐकून लई भारी वाटते ना! पण सॉफ्टवेअर तज्ञांचे जर स्तर पाडले तर मी साधारण ४ थ्या किंवा ५ व्या स्तरावर असेन.. आता कसे वाटते?? आणि हे आमच्या इंडस्ट्रीचे वास्तव आहे. सर्वांच्या दृष्टीने आयटीमधील एक्सपर्ट म्हणजे जादूगार, यक्ष असे वाटत असले तरी आमच्या आमच्यात प्रत्येकाला आपली लायकी, मर्यादा माहीत असते आणि आम्ही कधी जे नाही ते दाखवायचा प्रयत्न करत नाही. इतर प्रोफेशनल फिल्डमधे लोक अनेकदा आपल्या क्षमतेच्या पलीकडील काही करायला जातात आणि तोंडावर पडतात. आमच्यात साधारण ३-४ वर्षे अनुभव आला की “काय नाही करायचे” हे माहीत असते..
 • सॉफ्टवेअर मधे पैशाला फार महत्व नाही. इथे केवळ “बुद्धीमत्ता” (आणि तंत्रज्ञानाचे आकलन) ह्यावर तुमची किंमत ठरते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल देखील ओपनसोर्स डेव्हलपर्स बरोबर आदराने वागतात. तुम्ही पैशाने बुद्धीमत्ता/कल्पनाशक्ती विकत घेऊ शकत नाही हे ह्या क्षेत्रात वारंवार प्रत्ययाला येते. फेसबुक, व्हाट्सऍप, व्ह्यू, अपाचे, लिनक्स, mySQL सारखे असंख्य स्टार्टअप टॉपच्या कंपन्यांना पाणी पाजतात, अक्षरश: जमीनीवर आणतात. आमच्या क्षेत्रात वयावरून बुद्धीमत्ता आणि क्षमता जोखत नाही! १२ वर्षाचा मुलगा देखील “क्षमता असेल तर” गुगलच्या CTO ला गप्प बसवू शकतो.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या वयाचा विचार न करता त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते.. अनुसरले जाते..
 • सॉफ्टवेअर मधे टॉपला आहेत सिस्टीम डेव्हलपर्स.. हे लोक मुख्यत्वे कुठल्याही डिव्हाइसच्या ओएस (operating system) वर काम करतात. सर्वांना माहीत असलेले डिव्हाइसेस म्हणजे पिसी आणि मोबाईल आणि ओस – मायक्रोसॉफ्टची विंडो, लिनक्स, अन्ड्रॉइड (गुगलची असे म्हटले नाही बरे .. का ते शोधा!).. ह्याव्यतिरीक्त अजून खूप आहेत. तुमच्या ऑटोमॅटीक ऍसी मधे, वॉशींगमशीन मधै देखील ओएस असतात. ह्यावर वेगळा विषय आहे IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज! तो स्वतंत्रपणे पहा..
 • नंतरची लेव्हल आहे ओएस टूल्स डेव्हलपर्सची. ह्यात मुख्यत्वे लँगवेज, कंपायलर्स पासून डेटाबेस सिस्टीम डेव्लपर्स असतात.. ओएस डेव्हलपर्स चे उद्दीष्ट असते अधिकाधिक डिव्हायसेस आणि त्यांच्या कंपोनंट बरोबर बोलू शकेल अशी ओएस बनवणे तर टूल्सवाले त्यावर विवीध प्रकारचे टूल्स बनवतात जे वापरून ती ओएस अधिकाधीक वापरता येईल..
 • मग येतात कोअर ऍप डेव्हलपर्स. हे लोक मुख्यत्वे मायक्रोसॉफ्ट ऑफीस, एडीटर्स, फोटोशॉप असे ऍप बनवतात. शिवाय गेम्स इ. म्हणजे टूल डेव्हलपर्स नी बनवलेली टूल्स वापरून प्रत्यक्ष उपयोगी ऍप बनवणे. मोबाईल ऍप्स देखील.. शिवाय ह्यातच एक्स्टेंशन डेव्हलपर्स देखील आले, जे ऍपच्या शक्यता वाढवतात..
 • मग आमच्या सारखे मजूर डेव्हलपर्स. आम्हाला वरील सारे “माहीत असावे” लागते. प्रत्यक्ष येत नाही. टूल्स व ऍप्स माहीत असतात. त्यांचा वापर करून आम्ही एंड युजरसाठी वेबसाईट, छोटी मोबाईल ऍप्स, गेम्स इ. बनवतो. खरे सांगतो वर पासून चालू केले आणि टॉपचे डेव्हलपर जर १००% क्षमता पकडले तर आम्ही साधारण ६०% वाले आहोत. शिवाय कोअर एॅप डेव्हलपर्स (८०%) आणि आमच्यात देखील अनेक स्तर आहेत. आणि ते फिल्डमधे खूप स्पष्ट असतात.
 • मग आमच्या खालीदेखील आहेतच की डेव्हलपर्स. ह्यात नवखे, अननुभवी, “हावरट”, नुस्ता कोर्स केलेले, त्यातून ऑनलाईन कोर्स केलेले, केवळ कॉलेजमधे BSCIT, BCS केलेले इ. येतात. ही सारी रेंज कोडर्स ची आहे. ह्यातले फार कमी म्हणजे ३-४% डेव्हलपर्स असतात. जे पहील्यापासूनच ओपनसोर्स मधे सामील होतात, गुगल समर ऑफ कोड मधे भाग घेतात आणि सिलॅबस संपता संपता त्यांना बरोबर कॉल येतात आणि सरळ देश सोडतात. बाकी राहतात ते बऱ्यापैकी कोडर्स..
 • पण हे काहीही असले तरी आम्ही कोण आहोत?? आम्ही देव आहोत. तुम्ही ह्या डिजीटल विश्वात रमता, आता देखील तुमच्या लॅपटॉपवर, कोरावर हे वाचताय.. हे सारे विश्व आम्ही निर्माण केलेय. काय दिसले पाहीजे, का आणि कसे दिसले पाहीजे, काय बटन दाबल्यावर काय व्हायला पाहीजे हे सारे आम्ही ठरवतो आणि घडवतो! we are the alpha and omega! आणि ही ह्या इंडस्ट्रीची खासीयत.. मेडीकल खेरीज हे एक क्षेत्र असे आहे की तुम्हाला आदरच मिळतो! (क्लायेंटच्या शिव्या थोडावेळ विसरा हो..) .. लोकांना ते हुशार आहेत हे सिद्ध करायला परीक्षा द्याव्या लागतात, सर्टीफिकेट जोपासावी लागतात.. लोक मरमरून डॉक्टरेट करतात हो. तो “डॉ” लावायला. आम्हाला काही नाही करावे लागत. आमच्या आमच्यात आमची लायकी आम्हाला माहीत असेल, पण बाकी सर्वांसाठी आम्ही देव आहोत!
 • आता आम्ही करतो काय?? खरा डेव्हलपरची ताकद असते प्रॉब्लेम समजून घेणे. बहुतेक वेळा तुम्ही प्रॉब्लेम १ वाक्यात सांगता. “कुणालाही कुणाशीही सहजपणे बोलता यायला हवे” हा एका वाक्यातील प्रॉब्लेम व्हॉट्सऍपला जन्म देतो जो ५०%हून अधिक जग व्यापून उरतो. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की व्हाट्सऍप बनवताना एखाद्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट कुठे असतील, त्याच्या कडे व्हाट्सऍप असेल का, ते कसे कळेल, मेसेज कसा पाठवायचा, इमेज कशी, फाईल कशी, लिस्ट कशी दाखवायची, नाव/फोटो, स्टेटस.. लोकेशन कसे शेअर करायचे.. आता तर पेमेंट देखील आणले.. असे किती प्रकारचे प्रश्न स्वत:च डेव्हलपर सोडवतो जे क्लायेंटच्या ध्यानीमनी देखील नसतात. उदा. सात-बारा ऑनलाईन आणायचे. एका क्षणात डेव्हलपरला भौगोलीक रचना, प्रशासकीय रचना, ठिकठिकाणी असलेली तांत्रीक सुवीधा, इंटरनेट, ऑपरेटरचा शैक्षणिक दर्जा, ७-१२ चे सारे निकष, फेरफार, त्यांचा अर्थ, त्यांच्यातील छोट्याते छोटे व्हेरीएशन समजून ह्या साऱ्याला एका सूत्रात बांधणारे लॉजीक डेव्हलप करायचे असते. फाईल मधे काय आणि डेटाबेसमधे काय? ते सर्वरपासून ते क्लायेंट पर्यंत जाणार कसे आणि एका क्लिक मधे! एका घटकेत त्याला सारे रोल्स निभवायचे असतात. शिवाय आयटी तंत्रज्ञानाचे चॅलेंजेस तर खूपच वेगळे. असेच डॉक्टर म्हणतो जेव्हा मला पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम पाहीजे तेव्हा त्याला डॉक्टरच्या रोलमधे जावे लागते. प्रत्यक्ष पेशंट तपासायचा नाही, पण डॉक्टरची सारी भुमीका आणि कृती कळली नाही तर सॉफ्टवेअर कसे बनवाल?? आता लक्षपूर्वक पहाल तर तुम्हाला कळेल अंतरीक्ष यान, अंतरीक्षयात्रीच्या सूट इथपासून ते डॉक्टर-नर्स, इंजीनीअर, वकील, व्यापारी, पायलट, सीए पासून ते अकाऊंटंट, शेतकरी, शिक्षक ते विद्यार्थी पर्यंत सारी सॉफ्टवेअर्स डेव्हलपर्स बनवतात. आम्ही सोडून कुणालाच ते येत नाही! म्हणून अनेकदा सॉफ्टवेअर वाले भयंकर टेंशनमधे असतात, अशा प्रकारचे अदृश्य प्रॉब्लेम सोडवत बसलेले असतात की जगाचे भानही नसते. जनरली पहा, सॉफ्टवेअर वाल्यांना खूप खायला लागते. थोडे वादातीत आहे, पण खरेच मेंदू प्रचंड उर्जा वापरतो. झोप कमी होते, शरीराच्या सवयी मोडतात. डोळे खराब होतात. मधेच ब्लँक व्हायला होते. आयुष्यमान कमी होते.. आम्ही प्रत्यक्ष आयुष्याची किंमत मोजतो..
 • आणि मग हे सारे करून पैसे कमवतो! कसे? आता हे सिक्रेट आहे.. कुणाला सांगू नका हा प्लिज.. प्रत्येक डेव्हलपर/कोडर जो जो चांगला कोड लिहीतो तो सारा रियुजेबल असतो. परत वापरता येतो. उदा. मला कुणी एक सॉफ्टवेअर बनवायला सांगीतले “स्पेशल पर्पज अकाऊंट” साठी. तर ते ऍनालाईज करतानाच मी हे एकाहून जास्त लोकांना कसे बरे विकता येईल ह्याचा विचार करून, तसा प्लॅन करून बनवतो. म्हणजे ह्यात अधिकाधिक “फ्लुइडीटी” असते. डायनॅमिझम असते. पहीली कॉपी बनवायला मला एक महीना लागतो. मी त्याचे ५००००/- चार्ज करतो. क्लायंट देतो. ह्यात माझी कमाई साधारण १५०००/- असते. पहील्या सॉफ्टवेअरमधे देखील २५-३०% मार्जीन असतेच. ह्यात काही आश्चर्य नाही. पण धमाल इथून पुढे आहे. माझाकडे सॉफ्टवेअर रेडी असते. आता मी आहे तसे सॉफ्टवेअर त्याच क्षेत्रातील इतरांना डेमो करतो. त्यांची गरज असतेच. त्यांना मी ते ४००००/- मधे उपलब्ध करतो. इथे माझे काम फारतर ४ दिवसांचे असते. आणि मार्जीन साधारण २५-३०००० .. असे करता करता साधारण ४०-५० कॉपी विकल्या गेल्या की माझे सॉफ्टवेअर सेटल होते. विशेष एरर नसतात, सपोर्ट लागत नाही. मग मी एजंसी नेमतो किंवा विवीध ऍडमधून ते सॉफ्टवेअर प्रॉडक्ट सारखे आणतो. ह्यात १५००० पासून ते २५००० पर्यंत विवीध पर्याय असतात. आणि सगळीकडे किमान ७०% मार्जीन. एजंसी दिली तरी १५-२०% कमी होतात पण विक्री वाढते. सॉफ्टवेअर बऱ्यापैकी सेटल असल्याने सपोर्टची फार भानगड नसते. २ ऑपरेटर देखील चांगला टेलीफोनीक सपोर्ट देऊ शकतात. शिवाय ऑनलाईन हेल्प, चॅट सारखे पर्याय देखील असतात. ..
 • मग येते AMC… हे आमचे कुरण आहे. पहील्या वर्षी झालेल्या बिलींगच्या १५% पासून ते ४५% पर्यंत AMC आकारण्यात येते. हा केवळ मार्केटींग स्टंट आहे. AMC मधे काही कामच नसते. फक्त मधून फोन करून क्लायेंट रिव्हू घेत रहायचे. सॉफ्टवेअर्स अपडेट राखायचे.. लोक वर्षानुवर्षे AMC देत असतात.
 • मग असते बंडलींग. अनेक हार्डवेअर कंपोनंटवाले (व सॉफ्टवेअरवाले देखील) तु्म्हाला संपर्क करतात आणि त्यांचे उत्पादन प्रोमोट करण्यासाठी मार्जीन देतात. उदा. प्रिंटर, बारकोड स्कॅनर वाले.. मग तिथे उत्पन्न चालू होते..
 • शिवाय इतर सपोर्ट सर्विसेस असतात जसे की बॅकअप रिकव्हरी, सिस्टीम अपग्रेड, मायग्रेशन, कस्टमायझेशन, ऑन साईट सपोर्ट, ट्रेनिंग.. जमेल तिथे मिळेल तितके पैसे घेत जायचे!

Leave a Reply