कुकर आणि गैरसमज

कुकर हा विज्ञानाच्या अनेक उत्कृष्ठ शोधांपैकी एक आहे. ह्या शोधाने जगभरातील खाद्यपरंपरेमधे अमुलाग्र बदल घडवले. पहीले म्हणजे कुकरमधे पोषकद्रव्ये कमी पडतात असे म्हणणे म्हणजे ह्या हजार वर्षातील सर्वात मोठे असत्य होईल.. ट्रंपदेखील इतक्या थापा मारत नसेल हो..

कुकरमधे वाफेच्या प्रेशवर अन्न शिजत असल्याने ९५% पर्यंत पोषकद्रव्ये तशीच राहून कमी वेळेत शिजलेले अन्न मिळते. विश्वास बसत नसेल तर हे वाचा

अर्थात हे मी लिहीलेले आर्टीकल्स नाहीत. फक्त शोधून काढून देत आहे..

पहीले एक लक्षात घ्या.. त्याला प्रेशर कुकर म्हणतात. त्याचा नावातच त्याचे कतृत्व आहे. अन्न प्रेशरमधे असल्याने “कमी” उष्णतेवर शिजते. जितके इंजीनिअर आणि सायन्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांना लगेच कळेल मी काय म्हणतोय.. जेव्हा कमी हिट लागते तेव्हा त्यात असलेले व्हिटामिन्स, ऍन्टीऑक्सीडंट, प्रोटीन चेन आहेत तशा राहतात, आणि त्यांचे गुणधर्मही..

आता अजून जरा डीप डाईव्ह करा.. जेव्हा आपण ऊघड्या भांड्यात फोडणी घालतो, भाजी, आमटी अगदी भात शिजवतो तेव्हा अन्नाचा काही भाग, जो पातल्याच्या तळाशी असतो, तो आगीच्या सर्वाधीक संपर्कात असतो तिथे त्याल अत्यंत जास्त आच लागते. इतपती की त्यातील पोषकद्रव्ये होरपळतात. अशा प्रकारे अति गरम झालेला भाग हलका होतो, वर फेकला जातो.. कमी गरम असलेला आगीच्या खूप जवळ येतो. परत त्याचे न्यूट्रीशन जळतात.. आणि ही जी प्रक्रीया चालू राहते त्याला आपण ऊकळणे म्हणतो. आपण दूध का ऊकळवतो? त्यातले सारे बॅक्टरीया मरून जावे, पूर्ण निर्जंतूक व्हावे आणि अधिक वेळ टिकावे म्हणून. पण तुम्हाला हे जाणवते का की तुम्ही ह्याबरोबर सारे न्युट्रीशन देखील मारून टाकता?? नाही पटत ना?? वाचा –

अजूनही विश्वास बसणार नाही, कारण अनेक वर्षे आपण असेच करत आलोय!

आता मी तुम्हाला सांगतो अजून एक स्फोटक गोष्ट … तुम्ही भात शिजण्यासाठी दोन शिट्या काढता का? डाळ शिजण्यासाठी तीन?? मग तुम्ही जेवण करायला चुकताय! मुळात शिट्यांचा अन्न शिजण्याशी संबंधच नाही. अन्न कुकरमधे लावून ते कमी आचेवर ठेवून चांगली वाफ जमायची वाट पहायची असते. शिट्टीचा फुरफुर आवाज यायला लागला की समजायचे वाफ अनावर होतेय. आच बारीकच ठेवायची. आणि अगदी तो क्षण येतो जेव्हा आता शिट्टी येणार (वाफेचा कडेलोट) तेव्हा गॅस/स्टोव्ह बंद करून टाकायचा. आणि ह्या पॉईंटनंतर साधारण ७-८ मिनीटांमधे व्हेज प्रकारातील अधिकाधिक सारे अन्न पुरेसे शिजलेले असते. कडधान्य शिजायला कदाचीत एखादा मिनीट जास्त लागेल. नॉनव्हेजला अजून ३-४ मिनीटे देखील एक्स्ट्रा लागू शकतात. पण हे प्रत्यक्ष २-३ वेळा करून तुम्ही अंदाज घेतला पाहीजे. कुकरच्या आकारमानानुसार देखील आतले वाफेचे प्रमाण व प्रेशर बदलत असल्याने वेगवेगळ्या कुकरवर ह्या व्हॅल्यू पक्क्या करून घेतल्या पाहीजे..

जेव्हा तुम्ही शिट्टी येऊ देता तेव्हा खरे तर तुम्ही छान साचलेले प्रेशर फुकट घालवता, दरम्यान पाण्याचे तापमान परत वाढावे लागते, परीणामी थोडे न्युट्रीशन फुकट जाते. वाफ रिलीज झाल्याने देखील त्यातून काही सत्व फुकट जाते.. नाहीतर दाब मेंटेन राहीला तर पदार्थाची चव, अरोमा आणि सत्व निसटू शकत नाही…

इतके सारे करूनही ज्यांचा ह्यावर विश्वास बसत नाही त्या सर्वांसाठी परंपरागत उदाहरण.. आपल्या मागच्या पिढीत चुलीवर जेवण करताना देखील आया, आजा डाळीच्या, भाजीच्या, मुख्यत्वे नॉनव्हेज रश्याच्या भांड्यावर जड झाकणी ठेवून त्यावर पाणी ओतत. अशाने काही प्रमाणात वाफ आत अरेस्ट होत असे. ती वरच्या झाकणीतील पाण्याला लागून थंड होऊन परत खाली जाई. नविन वाफ तयार होत असे. अशाने प्रेशर चांगले जमत असे आणि परत कुकर सारख्याच माफक फॉर्मुलामुळे अन्न चांगले आणि पोषकद्रव्ये फुकट न जाता अन्न शिजत असे..

दम बिर्यानीची रेसेपी माहीत असेलच, त्याचे प्रिंसीपल सांगत बसत नाही. आणि पोपटी??

चला वाफ आणि कुकर पुराण पुरे.. वॉट्सन आणि पिपीनला झोप लागणार नाही…

आता दुसरा भाग .. भांडी.. मातीची भांडी खरेच उत्तम! पण क्लिनअप करणे मोठा इश्यू असतो. आणि भांडी इंटरचेंज करणे शक्य नसते. उदा. आमटीचे भांडे दुधाला वापरणे… आणि मातीचे भांडे खूप चांगले भाजलेले असायला हवे नाहीतर तेल, रस झिरपतात..

केवळ पदार्थांची चव हवी आणि ती देखील उत्तम तर स्टेनलेस स्टीलला पर्याय नाही. पदार्थाशी कुठलीच केमीकल रिएक्शन नाही!

पितळी भांडी देखील उत्तम पर्याय होता, पण आता मिळतच नाही. तांब्याच्या भांड्यात जेवण करतच नाही. तांबे खूप व्होलाटाईल आणि अत्यंत कमी क्षमतेच्या आम्ल पदार्थाबरोबर देखील पटकन संयोग करते..

चपात्या, घावणे, ऑमलेट इ. करायला नॉनस्टीक पॅन किंवा कढई खूपच उत्तम..

Leave a Reply