जर गीतेमध्ये स्वतः देवाने “या विश्वातील प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेनेच होते” असे सांगितले असेल तर मग देव जगात फक्त चांगल्या गोष्टीच का घडवत नाही? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात नाही का??
मूळ देव निर्गूण, निराकार आहे. भानरहीत आहे. केवळ तेजस्वरूप. त्याच्या दृष्टीने काहिच चांगले नाही की वाईट नाही. अनंत काळच्या इश्वरी जीवनामधे संपूर्ण मानवी जीवन केवळे निमीषार्धागणीक आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने असलेले चांगले, वाईट, पाप-पुण्य इ. हिशोब देवाच्या गणीतातच कुठे नाही! आणि मुळात देव काही घडवत नाही!
एक सोपे उदाहरण पहा. आपल्या शरीरावर अनंत बॅक्टेरिया दर दिवशी, खरेतर दर तासाला जन्माला येत असतात. ते मोठे होतात, प्रजनन करतात, मरतात हे अव्याहत चालू असते. त्यांच्या त्यांच्यामधे प्रेम होत असेल, युद्ध होत असेल काय वाटेल ते होत असेल. आपल्याला माहित तरी आहे? आणि एकाक्षणी आपण हात सॅनिटायजर ने धुवून टाकतो आणि त्यांना वाटते देव कोपला आणि महाप्रलय आला.. आपले आयुष्य देखील देवाच्या तुलनेत बॅक्टेरिया इतपतच आहे! प्रार्थना करा देवाला इतक्यात सॅनिटायझरची बाटली नको मिळूदे, नाहीतर माझी पुढची पोस्ट पडायच्या आधी एक प्रलय आलेला असेल!